ACB TRAP

परळी थर्मलमधील उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड


बीड दि.26 : परळीतील परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित येथील उप कार्यकारी अभियंता याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवर परळीत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) बीड एसीबीच्या टीमने केली आहे.

अनिल रामदास वाघ (वय 36 उप कार्यकारी अभियंता,परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित) व खाजगी इसम आदिनाथ आश्रुबा खाडे (वय 36 रा.शिवाजी नगर, परळी जि.बीड) अशी लाचखोरांचे नाव आहे. त्यांनी तक्रारदार यांना थर्मल केंद्र ,परळी येथील राख वाहतुकीसाठी 20 गेटपास देण्यासाठी लोकसेवक यांनी प्रत्येकी गेटपास 4000 रूपये प्रमाणे एकुण 80 हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगितली व सदर लाच रक्कम 80 हजार रुपये खाजगी व्यक्तीने स्वतःपंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड एसीबीने केली.

Tagged