acb trap

सरपंचपुत्र एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली.

सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे लाचखोर सरपंच पुत्राचे नाव आहे. तक्रारदार यांचे मुलाचे नावे मनरेगा अंतर्गत मंजूर जलसिंचन विहिरीचे कुशल कामगाराचे अनुदानाचे रक्कमेच्या चेकवर आरोपी यांनी त्यांचे आईची (सरपंच श्रीमती आशाबाई नंदू उगलमुगले यांची ) सही घेऊन देण्यासाठी तसेच ग्रामसेवक यांना देण्यासाठी असे एकूण 20 हजार रुपयांची शासकीय पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

Tagged