माजलगावात धारूरच्या शिपायाचा डोक्यात दगड घालून खून

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव – धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या अनिल सर्जेराव शेंडगे या शिपायाला फोनवर बायपास रोडला बोलवून डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना दि.२० गुरुवार रोजी सायंकाळी नऊच्या दरम्यान घडली.

Anil sarjerao shendge

धारूर तालुक्यातील चिखली येथील मूळ रहिवासी असलेला व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर असलेले माजलगाव शहरातील मंजरथ रोड शिक्षक कॉलनी येथील रहिवासी अनिल सर्जेराव शेंडगे यांना रात्री अज्ञात व्यक्तींनी आठच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर कॉल करून बायपास रोडला बोलून घेतले आणि त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला ही घटना गुरुवार रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेप्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल तळेकर आदी तपास करत आहेत.

Tagged