navari

सुहागरात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता!

न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

पैठण, दि. 20 : ऐन सुहाग रात्रीच्या दिवशीच नवरी बेपत्ता झाल्याची तक्रार पैठण ठाण्यात दाखल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलीसांकडून नवरीचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे नवरीचे दागिने व रोख 50 हजार रुपये देखील गायब असल्याचे आढळून आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिैठण शहरांमध्ये लक्ष्मीनगर भागामध्ये राहणार्‍या कृष्णा कारभारी वंसारे या युवकाचे लग्न गेल्या अनेक दिवसापासून होत नव्हते. कृष्णाची आई सुनंदाबाई वंसारे यांनी आपल्या परिचयातील शेख नूर महंमूद रा.तेलवाडी (ता पैठण) यांना मुलीचे एखादे चांगले स्थळ पाहण्यास सांगितले होते. स्थळ पाहण्यासाठी 5 हजार रुपये घेतल्यानंतर लगेच कृष्णासाठी जालना येथे चांगलं स्थळ असून आपण मुलीला 50 हजार रुपये हुंडा दिल्यास लग्नासाठी मुलीची बहीण व मेव्हणा तयार होईल असे एका बैठकीत सांगण्यात आले. त्यानुसार जालना येथील उषा पवार या मुली सोबत कृष्णाने धुमधडाक्यात सात फेरे मारले.

मात्र नवरी मिळाल्याचा आनंद असलेले कृष्णा व त्याचे परिवार घरात झोपेत होते. मात्र सकाळी उठल्यानंतर नवीन नवरी उषा कुठेच दिसून आली नाही. तिच्या गळ्यात मंगळसूत्र, पायातील चैन, जोडवे असे 70 हजार रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने होते. शिवाय रोख 50 हजार रुपये सुध्दा तिच्याजवळ असल्याचे सासू सुनंदाबाई वंसारे व नवरा कृष्णा यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नवरीची बहिण पूजा पवार, मेव्हणा राजू पवार (रा. जालना) मध्यस्थी शेख नूर महंमूद यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरु आहे. त्यानंतरच प्रकरणातील खरा प्रकार समोर येणार आहे.

Tagged