suicite

टॅब न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याने घेतला गळफास

करिअर क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई  : दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आता मला टॅब घेवून द्या असे मुलाने वडीलांना सांगितले. परंतु गेवराईमध्ये टॅब उपलब्ध नसल्याने दोन चार दिवसांनी घेवू असे वडील म्हणाले. याचा राग आल्याने घरात कुणी नसताना एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे गुरुवारी (दि.18) घडली.

अभिषेक राजेंद्र संत (वय 17 रा.भोजगाव ता.जि.बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने आताच दहावीची परिक्षा दिलेली आहे. पुढील ऑनलाईन शिक्षणासाठी त्याला टॅब हवा होता. त्याने टॅबसाठी आई-वडीलांकडे मागणी केली. परंतु घरातील परिस्थिती हालाकीची आहे. तरीही वडीलांनी टॅब घेण्यासाठी होकार दिला. आणि टॅब घेण्यासाठी गेवराईला गेले. मात्र दुकानदाराने सध्या टॅब उपलब्ध नाही. दोन चार दिवसामध्ये येईल असे सांगितले. त्यामुळे वडीलही नंतर टॅब घेवू असे म्हणाले. याचा राग आल्याने घरी आल्यानंतर घरातील सगळे शेतात गेल्यावर गळफास घेवून अभिषेकने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस पुरुषोत्तम चोबे, पोउपनि.युवराज टाकसाळ, सफौ.फड, बांगर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्या पाश्चात आई-वडील, भाऊ, आजी, आजोबा असा मोठा परिवार आहे.

Tagged