पेरणी करताना बैलाचा पाय शेतात आल्यामुळे एकाचे डोके फोडले

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

केज : शेतात पेरणी करताना बैलचा पाय आमच्या शेतात का गेला? म्हणून केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे तिघांनी मारहाण करून पती-पत्नी मारहाण करून दोघांचे डोके फोडले आहे.

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे दि.18 जून रोजी रावसाहेब कोंडीबा चौरे हे त्यांच्या जळदरा नावाच्या शेतात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी करीत असताना दुपारी 12 वा. च्या दरम्यान तिफन वळवीत असताना बैलाचा पाय शेजारील शेतकरी गोरख सिताराम चौरे यांच्या शेतात गेला. त्या कारणा वरून कुरापत काढून गोरख सिताराम चौरे त्याची मुले श्रीहरी सिताराम चौरे व मेघराज सिताराम चौरे यांनी रावसाहेब कोंडीबा चौरे यांच्याशी शिवीगाव करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच श्रीहरी चौरे यांनी रावसाहेब चौरे याच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या रावसाहेब चौरे याची पत्नी सौ. चंद्रकला हिच्या डोक्यात गोरख चौरे याने दगड मारून जखमी केले. या प्रकरणी रावसाहेब चौरे त्यांच्या फिर्यादी नुसार केज पोलीस स्टेशनला गोरख सिताराम चौरे, मेघराज सिताराम चौरे व श्रीहरी सिताराम चौरे या तिघांच्या विरोधात गु. र. नं. 227/2020 भा.दं.वि. 326, 324, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम चेवले हे पुढील तपास करीत आहेत.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged