vishbadha

कवडगाव येथे फराळातून विषबाधा

न्यूज ऑफ द डे वडवणी

वडवणी , दि.10 : तालुक्यातील मौजे कवडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त केल्या जाणार्‍या भगर या फराळातून जवळपास 65-70 जणांना विषबाधा झाली. त्यांना मळमळ व चक्कर अशी सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने सर्वांनाच वडवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु करण्यात आले. या घटनेने तालुक्यात लागल्याने एकच खळबळ उडाली.

आषाढी एकादशीनिमित्त सर्वच घरात उपवास केला जातो. यासाठी भगर शाबूचा वापर होतो माञ भगरीमुळे अनेकदा विषबाधाचे प्रकार घडले आहेत. अशातच कवडगाव येथे रविवारी जवळपास 70 नागरिकांना मळमळ व चक्कर येवू लागल्याने हे रुग्ण हे दुपारी 4 च्या सुमारास वडवणी शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब तांदळे, डॉ अरूण मोराळे यांनी प्राथमिक उपचार करून सर्वांची प्रकृती स्थिर केली.
काही नागरिक तातडीने उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल झाले. याबाबत डॉ शंकर वाघ म्हणाले की कवडगाव येथील नागरिकांना एकाच वेळेस उपवासाच्या फराळातून विषबाधा झाल्याचे दिसत असून उपचार सुरू आहेत. सर्व रूग्ण हे स्थिर आहेत. कौशल्या मुंडे, नानासाहेब तोंडे, शार्दूलाबाई नांदूरकर, महेश लव्हळे, लता खरात, अशाबाई बावरे, वैष्णवी लेंडळे, अर्चना नांदूरकर, शिवाजी लेंडळे, अंबिका शेजवळ, पार्वती मुंडे, सुचिता राठोड,कोमल धायतीडक, अनिता बागडे, गोरख बाबरे, नवनाथ बाबरे, राधा काळे, इंदूबाई काळे, योगिता काळे, नवनाथ पडघन, वैष्णवी आंधळे, राजेभाऊ मुंडे, अकुबई पडघन सह दहा जण खाजगी रूग्णालयात उपचार घेत असून प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी येथे विनोद काळे, भगवान काळे, छाया बाबरे यांनी उपचार केले तर गावातील जिल्हा परिषद शाळेत जवळपास 30 जणावर आरोग्य विभागाने उपचार केले. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे म्हणाले की घटनेची माहिती मिळताच गावात आरोग्य पथक पाठविले व उपचारार्थ प्रयत्न केले. भगरीमधून विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शी दिसत असून याबाबत अन्नभेसळ विभागाला माहिती दिली आहे. नेमके कशामुळे झाले लवकरच स्पष्ट होईल. रूगणावर उपचारासाठी सरपंच संदिपान खळगे, समुदाय आरोग्य सहायक डॉ थोटे देवेंद्र, डॉ. गावडे, डॉ.आळणे आरोग्य सेविका डोंगर आरोग्य सहायक मधुकर साळवे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Tagged