ajit pawar

थकवा जाणवत असल्याने अजित पवार होमक्वारंटाइन

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई, दि. 22 : करोनाच्या काळातही सातत्यानं कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी थकवा जाणवत असल्यानं त्यांनी काही दिवस घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून देण्यात आली आहे. या ट्विटला अजित पवारांनी रिट्विट केले आहे.


अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. ताप असल्यानं खबरदारी म्हणून त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, थकव्यामुळं त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रम व बैठका रद्द केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समजतं. करोनाची साथ व त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात अजित पवार सातत्यानं काम करताना दिसत होते. लॉकडाऊनच्या काळातही मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. अनेक बैठका सुरू होत्या. परतीच्या पावसानं केलेल्या नुकसानीची पाहणी नुकताच त्यांनी काही ठिकाणचा दौराही केला. पुणे, सोलापुरातील काही भागांतील पिकांची पाहणी करून ते घरी परतले होते. त्यानंतर ताप जाणवत असल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली होती.

Tagged