reporter

कोरोनाच्या भितीने पत्रकाराचा मृत्यू

कोरोना अपडेट गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराईतील धक्कादायक प्रकार

गेवराई: कोरोना महामारीने बीडमध्ये थैमान घातले आहे. कोरोना बीडमध्ये उशीरा दाखल झाला असला तरी, त्याचे परिणाम मात्र बीडला भोगावे लागत आहेत.

रोज वाढणारी रूग्णसंख्या, मृत्यू याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पत्रकार हे सतत तत्पर राहून बातम्या देत असतात मात्र, कोरोनाची भिती त्यांच्याही मनात आहेच. गेवराईचे पत्रकार संतोष भोसले यांचा कोरोनाच्या भितीने मृत्यू झाल्याची घटना आज दि. 28, मंगळवार रोजी सकाळी घडली आहे.

गेल्या काही दिवसापासून, तापेने आजारी आपण आजारी आहोत आणि कोरोना पॉझिटीव रूग्णाबरोबर फिरल्याने आपल्याला कोरोना होतो की काय अशा भितीने गेवराईतील पत्रकार संतोष भोसले यांचा सकाळी बीड जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. यामुळे, पत्रकारीता विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

Tagged