sushant singh rajput and riya chakraborti

सुशांत सिंह sushant sinh आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

देश विदेश मनोरंजन

पाटणा, दि.28 : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह sushant sinh आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती rhea chakraborty विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया ही सुशांतसिंह यांची प्रेयसी होती. सुशांत सिंहच्या वडीलांनी तिच्या विरोधात तक्रार नोंद केल्यानंतर पोलीसांनी हा गुन्हा नोंद केला. सुशांतने मुंबईतील वांद्रे भागात 14 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.

वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी अनेकांची चौकशी करुन जबाब नोंदवला असून यामध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. संजय सिंग यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीविरोधात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही उल्लेख आहे.याशिवाय चार सदस्यांचं एक पथक मुंबईला पाठवण्यात आलं आहे. हे पथक मुंबई पोलिसांकडून केस डायरी तसंच इतर महत्त्वाची कागदपत्रं घेणार असल्याची, माहिती संजय सिंग यांनी दिली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे.