आय.सी.एम.आरच्या नावाने पसरवलेला सर्वे बोगस

देश विदेश

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नावाने सध्या विविध माध्यमांमध्ये एक सर्वे फिरत आहे. यात नोव्हेंबर महिन्यात देशात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र, आज दुपारी आयसीएमआरने हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या संदर्भात ट्विट करत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने होताना दिसत आहे. अशातचं एक धक्कादायक सर्वे आयसीएमआरच्या नावाने फिरत आहे. या सर्वेनुसार देशात नाव्हेंबरच्या मध्यात कोरोनाचं विनाशकारी रुप पाहायला मिळेल. देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे कोरोना संसर्गाचा पिक हा पुढे ढकलण्यात यश मिळाले. मात्र, हा पिक नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात येऊ शकतो, असं या सर्वेत मांडण्यात आले आहे. हा सर्वे आयसीएमआरच्या सदस्याने केल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.

काय आहे सर्वे?
देशात लॉकडाऊन जाहीर केल्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कारण, कोरोना संसर्गाचा जो पिक 34 दिवसांनी येणार होता. तो आता 74 दिवासांवर पुढे ढकलला असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. यात नोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल, असा दावा करण्यात आला आहे. हा सर्वे आय.सी.एम.आरच्या नावाने फिरत होता. मात्र, हा सर्वे खोटा असल्याचं आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Tagged