10th result

प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल लागणार उद्या

करिअर न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई ः कोरोना महामारीने सगळ्या क्षेत्राचे नुकसान केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर इतिहासात प्रथमच इतकी उलथापालथ पाहायला मिळाली. दहावीचा तर एक पेपरसुद्धा या कोरोनामुळे रद्द करावा लागला. निकालाबाबत असणारी अस्पष्टता खूप काळ होती.

मात्र, आता प्रतिक्षा संपली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजे 29 जूलै 2020 रोजी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या (बुधवार) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, औंरगबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या नऊ विभागात 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यमंडळाच्या संकतेस्थळांवर ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

या आहेत वेबसाइट
http://www.mahresult.nic.in/
http://www.sscresult.mkcl.org/
http://results.maharashtraeducation.com/
http://www.mahasscboard.in/

Tagged