बीडचे नवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते

न्यूज ऑफ द डे बीड

डॉ.अशोक थोरात यांना मिळणार बढती

बीड दि.26 : येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना शासनाकडून बढती मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून त्यांच्या ठिकाणी डॉ.सुर्यकांत गिते यांची गुरुवारी (दि.26) नियुक्ती करण्यात आली आहे.
      सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यातील पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत रामचंद्र गिते यांची बीडचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजन नियुक्ती करण्यात आली आहे. अवर सचिव व्ही.पी.घोडके यांच्या स्वाक्षरीने आदेश पारित करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ.अशोक थोरात यांनी गत अडीच-तीन वर्षात तोकडे मनुष्यबळ, सुविधांचा अभाव असताना अत्यंत उत्कृष्टरित्या काम केले. कोरोना काळात त्यांनी उत्तमरित्या परिस्थिती हाताळली. त्यांचा कार्यकाळ सकारात्मक, नकारात्मक बाबींनी कायम चर्चेत राहिला.

Tagged