bibatya

माजलगावच्या मंगरूळ शिवारात हिंस्त्र प्राण्याकडून वासरावर हल्ला

बीड माजलगाव

माजलगाव- तालुक्यातील मंगरूळ शिवारात हिंस्त्र प्राण्याकडून एका वासरावर हल्ला करण्यात आला आहे. हा हिस्त्र प्राणी बिबट्या असल्याची माहिती स्थानिक शेतकर्‍यांनी दिली आहे. अरूण देशमाने आणि शिवाजी राऊत या शेतकर्‍यांनी या बिबट्याला प्रत्यक्ष पाहील्याचे तहसीलदारांना सांगितले आहे. या घटनेनंतर माजलगावच्या तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

वासराला या हिंस्त्र प्राण्याने रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान लक्ष्य केले.
हिंस्त्र प्राण्याच्या पायाचे ठसे


मंगरूळ शिवारातील सर्वे नं.120 मध्ये बंडू घाटूळ यांच्या वासराला या हिंस्त्र प्राण्याने रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान लक्ष्य केले. वासराच्या गळ्याला चावा घेतल्याच्या जखमा येथे दिसून आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये दहशत पसरली असून या प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Tagged