bibtya halla

नेकनूर परिसरात शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला!

नेकनूर दि.11 : नेकनूरच्या दक्षिणेस असलेल्या आठ किलोमीटरवरील कळसंबर परिसरात उसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. त्यानंतर काही तासातच बिबट्याने एका शेतकर्‍यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. सदरील शेतकरी गंभीररित्या जखमी झाला असून त्यावर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि.11) दुपारी कळसंबर येथील गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या […]

Continue Reading
bibatya

माजलगावच्या मंगरूळ शिवारात हिंस्त्र प्राण्याकडून वासरावर हल्ला

माजलगाव- तालुक्यातील मंगरूळ शिवारात हिंस्त्र प्राण्याकडून एका वासरावर हल्ला करण्यात आला आहे. हा हिस्त्र प्राणी बिबट्या असल्याची माहिती स्थानिक शेतकर्‍यांनी दिली आहे. अरूण देशमाने आणि शिवाजी राऊत या शेतकर्‍यांनी या बिबट्याला प्रत्यक्ष पाहील्याचे तहसीलदारांना सांगितले आहे. या घटनेनंतर माजलगावच्या तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मंगरूळ शिवारातील सर्वे नं.120 मध्ये बंडू घाटूळ यांच्या […]

Continue Reading
bibtya halla

नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश

बीड- पैठण, आष्टी, करमाळा तालुक्यात तब्बल आठ जणांच्या नरडीचाघोट घेणार्‍या बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून बिबट्याच्या दहशतीत वावरणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. वन विभागाच्या शार्प शुटरने करमाळा तालुक्यातील वांगी गावात ह्या बिबट्याला टिपले आहे. बिबट्याने पैठणमध्ये बाप-लेकाच्या नरडीचा घोट घेतला होता. तर आष्टीत एक बालक, एक पंचायत समिी […]

Continue Reading
bibatya halla

मिशन बिबट्या : ऊस पेटवून दिला पण तरीही बिबट्या निसटला; फायरही चुकवले

करमाळा, दि. 7 : करमाळा तालुक्यात तीन बळी घेणार्‍या बिबट्याला मारायचे आजचे सर्व प्रयत्न फेल गेल्याने बिबट्याचे वास्तव्य असलेल्या चिखलठाण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला […]

Continue Reading
bibatya

माजलगाव तालुक्यातही आढळला बिबट्या

माजलगाव- तालुक्यातील सावरगाव शिवारात आज (सोमवारी) दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली गोरे यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे. तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. यावेळी सर्वे नं.111 मध्ये त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड […]

Continue Reading
nagnath garje bibatya attack

पंचायत समिती सदस्यपती नागनाथ गर्जे बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार

आष्टी येथील खळबळजनक घटना आष्टी- दि.24 : आष्टी तालुक्यातील सुरुडी पंचायत समिती गणाच्या सदस्य आशाबाई गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकर्‍यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.सध्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्यावेळी पाणी देण्याशिवाय […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यात बापलेकाचा मृत्यू

पैठण तालुक्यात भीतीचे वातावरण पैठण दि १७ : चंद्रकांत अंबिलवादे– पैठण तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.16) रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करत असलेल्या बापलेकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील गावे दहशतीखाली आली आहेत. अशोक मखाराम […]

Continue Reading