bibtya halla

नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश

न्यूज ऑफ द डे बीड शेती

बीड- पैठण, आष्टी, करमाळा तालुक्यात तब्बल आठ जणांच्या नरडीचाघोट घेणार्‍या बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून बिबट्याच्या दहशतीत वावरणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

वन विभागाच्या शार्प शुटरने करमाळा तालुक्यातील वांगी गावात ह्या बिबट्याला टिपले आहे. बिबट्याने पैठणमध्ये बाप-लेकाच्या नरडीचा घोट घेतला होता. तर आष्टीत एक बालक, एक पंचायत समिी सदस्य पती, आणि एका वृध्द महिलेला ठार केले होते. करमाळा तालुक्यातही बिबट्याने तिघांना ठार मारले होते. त्यामुळे या बिबट्याला ठार करण्यात यावे अशी मागणी आ.सुरेश धस, बाळासाहेब आजबे यांनी वन विभागाकडे केली होती. त्यामुळे राज्यातील वन विभागाचे अनेक पथके या बिबट्याच्या मागावर होती. मात्र महिनाभरापासून बिबट्या गुंगारा देत होता. करमाळ्यात एका ऊसाच्या फडाला देखील आग लावण्यात आली होती. त्याच्यावर फैरीही झाडण्यात आल्या होत्या. मात्र तरीही हा बिबट्या पळून गेला होता. आज अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास हा बिबट्या वांगी येथे असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी त्यास ठार केले.

Tagged