bibatya

माजलगाव तालुक्यातही आढळला बिबट्या

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव- तालुक्यातील सावरगाव शिवारात आज (सोमवारी) दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली गोरे यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे.तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. यावेळी सर्वे नं.111 मध्ये त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या गव्हाच्या शेतातून पलिकडे पसार झाला. त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, सरपंच अभिमान जगताप, सुग्रीव नाईकनवरे, बाबा नाईकनवरे, पिराजी नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले. याची माहिती ग्रामस्थांनी तहसिलदार वैशाली पाटील, वन विभागाच्या अधिकार्‍यांना व पोलीस प्रशासनास दिली आहे. मात्र हे पावलांचे ठसे बिबट्याचेच की अन्य कुणाचे याची खातरजमा वन अधिकारी आल्यानंतरच होईल.

परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले.

परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले.

Tagged