अंमळनेर ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा!

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा


पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
बीड
दि.26 : बीड-अंमळनेर रोडवरील एका बिअरबारच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरु होता. विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी बुधवार, 26 एप्रिल रोजी धाड टाकत सहा जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमळनेर-बीड रोडवर जय बिअरबार आहे. त्याच्या पाठीमागे सुरेश अरुण पोकळे यांच्या शेतात जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा मारला. यावेळी आजिनाथ भाऊ फरताडे (रा.पांढरवाडी ता. पाटोदा), नामदेव माणिक जाधव (रा.चिंचोली ता.पाटोदा), विठ्ठल किसन पवार (रा.शिंदेवाडी ता.पाथर्डी), राजू गजेंद्र जाधव (रा.चिंचोली ता.पाटोदा), सुग्रीव बाजीराव मिसाळ (रा.डागाचीवाडी ता.पाटोदा), तुकाराम भीमराव गायकवाड (रा.कोतन ता.पाटोदा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासह मालक सुरेश अरुण पोकळे यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये अंमळनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे, तसेच पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू यांनी केली आहे.

Tagged