बीड पोलीस दलातील उपनिरीक्षकांच्या बदल्या

बीड


बीड दि.29 ः बीड जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस उपनिरीक्षक यांच्या परिक्षेत्रांतर्गत विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि.28) या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

बीड जिल्हा पोलीस दलामध्ये कालावधी पूर्ण झालेले बीड ग्रामीण ठाण्यातील उपनिरीक्षक पवनकुमार फुलसिंग राजपुत व नियंत्रण कक्षातील राजेंद्र भास्कर बनकर यांची औरंगाबाद ग्रामीणला तर बीड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पवनकुमार उदय अंधारे यांची उस्मानाबाद येथे विनंतीवरुन बदली करण्यात आली आहे. पवनकुमार राजपुत व पवनकुमार अंधारे यांची सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका असल्याने त्यांची बीड जिल्हा पोलीस दलातील कामगिरी ही अत्यंत चांगली राहिलेली आहे. जिल्हा पोलीस दलातील विनंती बदल्यांच्या फक्त तिघांचे आदेश आलेले आहेत. निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकही बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

Tagged