मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

 बीड , दि.30 : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.30) घडली.
विवेक राहाडे (वय 18 रा.केतूरा ता.जि.बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, विवेकला परीक्षेत कमी गुण मिळाले. याच नैराश्यातून विवेकने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि.सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.योगेश उबाळे करत आहेत.

Tagged