हर्ष पोद्दार अमरावतीला; भाग्यश्री नवटके पुण्यात

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने आज (दि.30) जारी केले आहेत.

दि.17 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदली आदेशात बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते. आजच्या बदली आदेशात त्यांना अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल- गट 9 च्या समादेश पदावर नियुक्ती दिली आहे. तसेच, माजलगावच्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक तथा जळगावच्या अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना पुणे शहर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदी नियुक्ती मिळाली आहे.

Tagged