बीड जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हा पोलीस दलात मोठ्या बदलांचे संकेत यापूर्वी मिळाले होते. अखेर पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने (दि.30) रोजी जारी केले आहे.

खालीलप्रमाणे झाल्या बदल्या
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल- गट 9 च्या समादेश पदावर नियुक्ती
बीडचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची नांदेडला बदली. त्यांच्या ठिकाणी नाशिक येथून सुनीज लांजेवार येणार.
माजलगावचे उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांची नागपूर येथील प्रशिक्षण विद्यालयात बदली. त्यांच्या ठिकाणी कळंबचे सुरेश पाटील येणार.
अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक राहूल धस यांची दौंडला बदली. त्यांच्या ठिकाणी भोकरदनचे सुनील जायभाय येणार.
मुंबईचे संतोष वाकळे हे बीडला उपअधीक्षक म्हणून येणार.

Tagged