बोंबला! आता महाबिजच्या सोयाबीन बियाणात माती

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या असतानाच आता तालुक्यातील गंगामसला येथील शेतकर्‍याने खरेदी केलेल्या महामंडळाच्या महाबीज बियाणाच्या बॅगमध्ये माती आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमके महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून ही शेतकर्‍यांची अशी फसवणूक होत असेल, तर शेतकर्‍यांनी विश्वास ठेवून मानत तरी कुणाच्या खांद्यावर टाकायची? असा सुर उमटत आहे.

माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील शेतकरी सचिन रामकृष्ण सोळंके यानी शहरातील शिवाजी कृषी केंद्र येथून पावती क्र.1176 दि.9 जुन 2020 रोजी सोयाबीन वान 335 महामंडळाचे 9 बॅग बियाणे खरेदी केले. त्या बॅग पेरणीसाठी लॉट नं.194 टॅग नं.20 ए.468505 व लॉट नं.194 टॅग नं.20 ए.466334 या दोन बॅगमध्ये माती मिश्रीत बियाणे निघाले. यावर शेतकरी सचिन सोळंके यांनी मोबाईलद्वारे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी माने यांच्याकडे तक्रार केली. मात्र माने यानी तक्रार ऐकून न घेता अरेरावीची भाषा करत, बियाणात माती निघाल्याने शेतकरी हतबल होणार नाही. शेतकरी हा सतत अनुदान मिळावे म्हणून कारणे सांगतो असे अपमानजनक वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले. यामुळे शेतकरी सचिन सोळंके यांनी माजलगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी हजारे यांच्याकडे लेखी तक्रार करून महामंडळाच्या सोयाबीन बॅगमध्ये माती मिश्रीत आल्याने माझे पिक उगवण्याची शाश्वती नाहीत. तसेच जो काही बियाणी कंपनीमुळे मानसिक त्रास झाला, यात दोषीची चौकशी करून माती मिश्रणाबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

Tagged