स्मार्टफोन्सवर 20 हजारांपर्यंत सूट

न्यूज ऑफ द डे

नवी दिल्लीः पुन्हा एकदा बिग सेव्हिंग डेज सेलला सुरुवात होणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टवर 23 जून ते 27 जून या दरम्यान बीग एस वींग डी वायएस सेलमध्ये एचडीएफीसी बँक कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. फ्लिपकार्टवर क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वरून कमीत कमी 4999 रुपयांच्या खरेदीवर 1500 रुपयांचा तात्काळ डिस्काउंट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर 500 रुपयांची सूट मिळणार आहे.

सुपर सेव्हिंग ऑफर्स अंतर्गत मोबाइल आणि टॅबलेट वर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहे. विवो झेड वनच्या 6 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा फोन 19 हजार 990 रुपयांऐवजी 14 हजार 990 रुपये आणि आयफोन 7 प्लस 37 हजार 900 रुपया ऐवजी 34 हजार 999 रुपये, एमआय मॅक्सचा 6 जीबी स्टोरेजचा फोन 37 हजार 999 रुपया ऐवजी 14 हजार 999 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तसेच ओप्पो ए9 2020 स्मार्टफोन 18 हजार 990 रुपयांऐवजी 12 हजार 990 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमाय, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर सुद्धा या फ्लिपकार्ट सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, कंप्लिट अप्लायसेंज प्रोटेक्शन आणि एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्ससरीज कॅटिगरीत हेडफोन आणि स्पीकर्स वर 60 टक्क्यांपर्यंत सूट, स्मार्टवॉच आणि बँड्सवर 60 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ई कॉमर्स कंपनी बेस्ट सेलिंग लॅपटॉपवर 40 टक्के सूट ऑफर केली जात आहे. या प्रोडक्ट्सवर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स लागू आहे.