accedent

बैलगाडी-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव दि.25 : ऊसाची वाहतूक करणार्‍या बैलगाडीला दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माजलगाव-परभणी रस्त्यावर दुगडपंपाजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.
अमोल काबुराव हांडे (वय 27 रा.शुक्लतिर्थ लिमगाव ता.माजलगाव) असे मयताचे नाव आहे. अमोल हा आपले काम आटोपून माजलगावहून शुक्लतिर्थ लिमगावकडे दुचाकीवरुन जात होता. माजलगाव ते परभणी या रस्त्यावर दुगड पंपाजवळ उस वाहतूक करणार्‍या बैल गाडीला धडक बसली. या अपघातात अमोलचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Tagged