budun mrutyu-panyat budun mrutyu

चिमुकल्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मातेचाही नदीपात्रात बुडून मृत्यू

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड


गेवराई दि.9 : कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेचा व तिच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील संगम जवळ रविवारी (दि.९) सकाळी उघडकीस आली.
पल्लवी गोकुळ ढाकणे (वय-२६) व तिचा मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे (वय-५) दोघे (रा.संगम जळगाव) अशी मयताची नावे आहेत. नेहमीप्रमाणे पल्लवी या गोदापात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सोबत पाच वर्षाचा समर्थही गेला होता. यावेळी खेळत असताना समर्थ पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला होता, यावेळी त्याला वाचविण्यासाठी पल्लवी ढाकणेने पाण्यात उडी मारल्याने दोघांना पोहता येत नसल्याने यांचा बुडून मृत्यु झाला. मयताचे शवविछेदन करण्यासाठी प्रेत गेवराई उपजिल्हा रूग्णलयात आणण्यात आले असून याघटनेने खळबळ उडाली आहे.

Tagged