मंदिरं खुली करण्यासाठी सरकारच्या हालचाली

देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

संस्थानांकडून आराखडा मागवण्याचा विचार

मुंबई : कोराना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात मंदिरं बंद करण्यात आली होती. मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह अनेक संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयारी सुरु केलीय. तसेच देवसस्थानांकडून मंदिरं खुली करण्यासंदर्भात आराखडा मागवण्याचा विचार असल्याचीही माहिती आहे. 
      शिर्डी साई संस्थान, सिद्धिविनायक मंदिर न्यास, पंढरपूर विठ्ठल मंदिर संस्थान अशा प्रत्येक देवस्थानांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नियमावली बनवण्याचा प्रस्ताव आहे. भाविकांच्या गर्दीचे नियोजन, स्वच्छतागृह, प्रसादालाय, पूजा-अर्चा-अभिषेक अशा विधींबाबत घ्यायची काळजी या बाबींचा आराखड्यात समावेश असणार आहे. त्या आधारावर प्रत्येक देवस्थानासाठी स्वतंत्र सोप बनणार आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याची माहिती आहे. शरीराचे तापमान, तोंडावरचा मास्क किंवा दोन व्यक्तींमधील अंतर डिटेक्ट करण्यार्‍या अद्ययावत यंत्रणा/मशिन्सचा वापर होणार आहे. येत्या काही दिवसात याचा आढावा घेऊन मंदिरं खुली करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

Tagged