बीड जिल्हा : आणखी पाच पॉझिटीव्ह

न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 31 स्वॅबपैकी पुन्हा एकदा पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली आहे.

बीड शहर व पाटोदा शहरातील रुग्णांचा समावेश आहे. यात पाटोदा येथील माळी गल्लीतील रहिवाशी असणारे 11 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय महिला, 7 वर्षीय मुलगा व 33 वर्षीय पुरूष असून बीड शहरातील शहेनशहा नगर भागातील 25 वर्षीय एका तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, आज 31 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 5 पॉझिटीव्ह तर 23 निगेटिव्ह अहवाल आले असून 3 अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged