जळालेला मृतदेह आढळला; घातपाताची शक्यता

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

आडस-होळ रस्त्यावरील घटना

केज : अनोळखी व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने केज तालुक्यात खळबळ माजली असून घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

केज तालुक्यातील आडस-होळ रस्त्यावरील वेदांत साधनास्थली पासून जवळ अनोळखी व्यक्तीचा पुर्णपणे जळालेला मृतदेह सकाळी आढळून आलं. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू आहे. सदरील व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या बुचाडात जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तपासात याबाबतीत खुलासा होईल. मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर आव्हान आहे. नेमकं महिलेचा की, पुरुषाचा हे ही जळाल्याने अंदाज येत नाही.

Tagged