dhananjay munde

साखर कारखाना जमीन गैरव्यवहार; धनंजय मुंडे यांना जामीन मंजूर

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथील साखर कारखाना जमीन प्रकरणात पालकमंत्री धनंजय मुंडे हे सोमवारी (दि.४) अंबाजोगाई येथील न्यायालयात आले होते.

तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या प्रकरणात २०१८ साली दाखल गुन्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्या. पाटील यांनी जामीन मंजूर केला. २०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वारंट निघाल्याने धनंजय मुंडे यांनी न्यायालासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला.

Tagged