accident

भरधाव कारच्या धडकेत दोन ठार!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे


चौघे गंभीर जखमी; घाटनांदूर येथील घटना
घाटनांदूर दि.4 : कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना जोराची धडक दिली. या अपघाता गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्वारातीमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघत्तत सोमवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. कार चालकाने मद्य प्राशन केले असल्याची माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री एक कार (एमएच-20 व्ही-2518) भरधाव वेगाने अंबाजोगाईकडून आली. या कारच्या चालकाचे घाटनांदूर येथे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक देऊन जवळपास शंभर मीटर अंतर फरफटत नेले. यात वैभव सतीश गिरी (वय 28), लहू बबन काटुळे (वय 30) यांचा मृत्यू झाला. तर, रमेश विठ्ठल फुलारी (वय 47), उद्धव निवृत्ती दोडतले (वय 50) आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सदरील कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्यूत खांब देखील उन्मळून पडला होता.

Tagged