लाच घेताना लिपिक रंगेहाथ पकडला
धारूर : येथील तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणारे महेश कोकरे यांनी तालुक्यातील आसरडोह येथील स्मशानभूमीच्या नोंदीसाठी २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. सदरील तक्रार केल्यानंतर महेश कोकरे यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तालुक्यातील आसरडोह येथील एका स्मशानभूमीची नोंद करण्यासाठी तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या महेश कोकरे या कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपयाची लाच मागितली होती यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे सदरील व्यक्तीने तक्रार दाखल केली होती लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी साडेचार वाजता सापळा रुचून महेश कोकरे यास रंगेहात पकडले.