सीईओ अजित पवारांनी धनराज मुंडेंच्या भोवती फास आवळला!

न्यूज ऑफ द डे बीड वडवणी

बीड दि.7 : मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार (ceo ajit pawar) यांच्यासोबत हुज्जत घालणे, त्याचबरोबर त्यांना शिवीगाळ करत अंगरक्षकाला धक्काबुक्की केल्याचे प्रकरण पालकमंत्री अतुल सावे यांचे कथीत स्वीय सहाय्यक धनराज मुंडे यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे. कारण या प्रकरणात मुंडेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने जामीन मिळाला, परंतू आता सीईओ पवार यांनी त्यांच्या परवानगीशिवाय कुठलीही माहिती देऊ नये, चर्चा करु नये, कार्यालयात बैठक करु नये असे आदेश वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना काढले आहेत, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. CEO Ajit Pawar’s order

धनराज राजाभाऊ मुुंडे (रा.वडवणी जि.बीड) (dhanraj munde) यांनी 11 मे रोजी जिल्हा परिषदेत जावून सीईओ अजित पवार यांच्या दालनात गोंधळ घातला होता, तसेच अंगरक्षकास धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात (beed city police station) धनराज मुंडेंवर कलम 353, 332, 186, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने 6 जून रोजी सीईओ अजित पवार यांनी वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना आदेश काढले आहेत. त्यात म्हटले आहे की, धनराज मुंडेंच्या पंचायत समिती वडवणी अंतर्गत विविध विकास कामे व इतर विभागाकडील कामाची चौकशी सुरु आहे. करिता या पत्रद्वारे आपणास सक्त सुचीत करण्यात येते की, धनराज राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या कार्यालयाकडे कोणत्याही प्रकारची माहिती देणे, चर्चा करणे कार्यालयामध्ये बैठक घेणे, अशा मागणी केल्यास माझ्या परवानगी शिवाय माहिती अथवा परवानगी देवू नये. अशा सक्त सूचना आपणास देण्यात येत आहेत. तसेच संबंधिताची काही तक्रार असल्यास त्यांनी ती रितसर ग्रामपंचायत कार्यालयाकडे मार्फत दाखल करावी. आपण व आपल्या अधिनिस्त कर्मचारी यांनी माझ्या परवानगी शिवाय कसल्याही प्रकारची कार्यालयीन माहिती, चर्चा करणे, कार्यालयामध्ये बैठक घेवू नये अथवा माहिती पुरवण्यात येवू नये परस्पर माहिती पुरवल्या संबधिता विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेवून आपल्या अधिनिस्त कर्मचार्‍यांना आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

CEO Ajit Pawar’s order

Tagged