MURDER

तीक्ष्ण हत्याराने भोसकून वृद्धाचा खून!

अंबाजोगाई क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे


बीड दि.7 : तीक्ष्ण हत्याराने भोसकून वृद्धाचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (दि.7) सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणी धारुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे (The old man was killed by stabbing with a sharp weapon!)

दत्तात्रय रामा गायके (वय 58, रा.केंद्रेवाडी, ता.अंबाजोगाई) असे मयत वृद्धाचे नाव आहे. मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास हा खून झाल्याचा अंदाज आहे. दत्तात्रय गायके यांच्या मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले होते. लग्नानिमित्त त्यांच्या दोन्ही मुली आणि जावई घरी आले होते. घटनास्थळी जावयाची दुचाकी आढळून आली आहे. तसेच घटना घडल्यापासून जावई फरार असल्याने संशयाची सुई जावयावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोणत्या कारणास्तव हा खून झाला हे अद्याप निष्पन्न झाले नसून धारूर पोलीस पुढील तपास करत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आला आहे. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी भेट दिली असून ठसे तज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.

Tagged