अखेर नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला आहे.

महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा, म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.

Tagged