nidhan

माजी नगरसेवक मधुकरराव पानपट यांचे निधन

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव : शहरातील भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी व माजी नगरसेवक मधुकरराव बाबाराव पानपट (वय 72) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे 5 वाजता निधन झाले.

भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून मधुकरराव पानपट यांची माजलगाव शहरासह परिसरात ओळख होती. अल्पशा आजाराने त्यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 11 वाजता मंगलनाथ स्मशानभूमी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दुःखात कार्यारंभ परिवार सहभागी आहे.

Tagged