accident

जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

क्राईम गेवराई बीड

गेवराई: तालुक्यातील तळेवाडी फाट्याजवळ  जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी (दि.4) सायंकाळी घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा गंभीर जखमी झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.25 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

       पोलीसांच्या माहितीनुसार, गणेश बबन देशमुख (22) व सचिन विष्णू भोसले (21, दोघे रा.पुरुषोत्तमपुरी, ता.माजलगाव) अशी मयतांची नावे आहेत.  पिकअप जीप (एम.एच.06 बीजी 1834) आणि दुचाकीची (एम.एच.12 बीजे 1947) तळेवाडी फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोन्ही तरुण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले. तातडीने दोघानांही रात्री उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान रात्री 12.25 वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मयत घोषीत केले.आज शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगीतले. अपघातातील दोन्ही मयत तरुण एकाच गावातील होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Tagged