निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची बातमी

Uncategorized

मुंबई : निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अद्ययावतचे काम करण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले होते. परंतू याच आशयाचे एक सही नसलेले पत्र व ई-मेल आयडीमुळे काही निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कुटूंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारीत आवाहन करण्यात येत आहे.

    अधिदान व लेखा अधिकारी यांनी सुधारीत आवाहनाव्दारे कळविले आहे की, माहितीचे संकलन करुन निवृत्तीवेतन विषयक डेटाबेस ‘अपडेट’ करणे हे निवृत्तीवेतनधारकांच्याही हिताचे असल्याने, झालेला संभम्र दूर व्हावा यासाठी, निवृत्तीवेतन धारकांनी त्यांचे नाव, ई-मेल आयडी, पॅन क्रमांक व मोबाइल क्रमांक इतकीची माहिती शक्य असल्यास [email protected] या ई-मेल आयडीवर किंवा अधिदान व लेखा कार्यालयाच्या पत्यावर पाठवावी, यापूर्वी ज्या निवृत्तीवेतनधारकांनी माहिती पाठविली असेल त्यांनी पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे अधिदान व लेखा अधिकारी यांनी कळविले आहे.

 

सर्व प्रक्रिया मोफत : शार्दूल देशपांडे
निवृत्तीवेतन धारकांनी करायची सर्व प्रक्रिया ही मोफत आहे. तरीही कोणत्याही व्यक्तीस वरील सर्व माहिती पाठविण्यास कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क (मो.क्र.9960420388) करावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दूल देशपांडे यांनी केले आहे.

Tagged