बीड : जुन्या काळी असलेला मांजरसुंबा घाट नॅशनल हायवे पूर्णपणे नेस्तनाबूत केला आहे. यानंतर डोंगर पोखरून घाटातील रस्ता करण्यात आलेला आहे. मात्र शंभर शंभर फूट उंच असलेल्या डोंगरावरील कडा कोसळण्याच्या मार्गावर असून या रस्त्यावर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डोंगराला तात्काळ जाळी लावायला हवी. अन्यथा आंदोलन करू. अनर्थ झाला तर आय.आर.बी. याला जबाबदार राहील, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड.अजित एम.देशमुख यांनी दिला आहे.
जुन्याकाळी मांजरसुंबा घाट अत्यंत नामांकित होता. नयनरम्य असलेल्या या ठिकाणी असलेला डोंगर आणि त्यातून घाट प्रवाशांना निसर्गरम्य वातावरणात आल्याचा अनुभव देत होता. तर दुसरीकडे या घाटातून येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे भीती देखील वाटत होते. मात्र आय.आर.बी.ने हा रस्ता करत असताना डोंगर फोडून रस्ता केलेला आहे. त्यामुळे आपण घाटातून जात आहोत का ? हे देखील समजत नाही. मात्र शंभर – शंभर फूट उंचीचा डोंगर कोरलेला आहे. त्या डोंगराला कोणताही उतार करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळित होणार असून या डोंगरातील अनेक कडा, कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पहिल्या पावसापूर्वी काही दगड खाली पडले होते. आता रिकामी झालेली दरडी पावसात कधीही कोसळू शकतात. ढासलायल झालेले दगड, दरडी तात्काळ काढून टाकायला हवीत. त्यामुळे आय.आर.बी.ने यात लक्ष घातले नाही, तर आम्हाला करावे लागेल, असा इशाराही ॲड.देशमुख यांनी दिला आहे