accedent

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात पोखरीचे दोघे ठार

क्राईम गेवराई

गेवराई : ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले होते. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री 7 च्या सुमारास कल्याण विशाखापट्नम महामार्गावर कोळगाव परिसरातील सुर्यमंदिरासमोर घडली. सदरील तरुण हे पोखरी येथील आहेत. जनार्दधन काशिनाथ मोघे (वय 30), भारत जालिंदर मोघे (वय 31), या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाळु सर्जेराव मोघे (वय 30) यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही सर्व राहाणार पोखरी ता.गेवराई येथील आहे. हे तिघे दुचाकीवरुन कोळगावकडुन पोखरीकडे येत होते. यावेळी सुर्यमंदीर संस्थान राष्ट्रीय महामार्ग 222 वर रात्रीच्या 7:30 दरम्यान आचानक आलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसली. दुचाकीवरील तिघेही बाजुला फेकले गेले. त्यामुळे रस्त्यावर पडल्याने तिघेही गंभीर जखमी होते. मंदिरातील मठाधिपती हभप हनुमान महाराज यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये दुचाकीचा चुरा झाला आहे.