दुर्देव! डॉक्टरने बिलासाठी मृताला जिवंत केलं!

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड दि.8 : डॉक्टरांकडे देव म्हणून पाहिले जातं. मात्र या देवरुपातच काही राक्षसही असल्याचे समोर येत आहे. चक्क बिलासाठी एका डॉक्टरने मृताला जिवंत केलं आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत त्यावर दोन दिवस उपचार सुरु ठेवले. आणि बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारले. या प्रकरणी डॉक्टरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरा येथील आधार हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आधार हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर यांच्यावर विश्वासघात, फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ.योगेश वाठारकरला इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. 24 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात ही घटना घडली आहे. इस्लामपूर पोलिसांनी सांगली जिल्हा रुग्णालया मार्फत मागवलेल्या अहवालात वाठारकर दोषी आढळून आल्याने मृत महिलेचा मुलगा सलीम शेख याच्या फिर्यादीनंतर कारवाई करण्यात आली. या कारवाईने राज्यातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Tagged