ANTIGEN TEST

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग तिसर्‍या दिवशी 248 व्यापारी पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.20 : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 212, बुधवारी 230 व्यापारी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्‍यांसह आता तीन दिवसातील पाच शहरातील पॉझिटिव्ह व्यापार्‍यांची संख्या 690 झाली आहे.

अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत व्यापारी व इतर सर्व व्यावसायिकांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु होते. त्यात 19 ऑगस्ट रोजी 6189 अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 230 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले. 18 ऑगस्ट रोजी 5769 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात 212 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

20 ऑगस्टच्या दिवसातील अ‍ॅन्टीजेन तपासण्या आणि एकूण पॉझिटिव्ह
अंबाजोगाई- ——1683 ——- 38
आष्टी—————-963 ——— 20
केज – —————767——— 28
माजलगाव ———425———- 62
परळी ————-2029 ——– 100
एकूण ————5877 ——— 248

दि. 19 ऑगस्ट रोजी शहरनिहाय केलेल्या अ‍ॅन्टीजेन तपासण्या आणि पॉझिटिव्ह
अंबाजोगाई- ——2091 ——- 46
आष्टी—————-600 ——– 33
केज – ————–607——— 17
माजलगाव ———859——– 29
परळी ————-2032 —— 105
एकूण ————6189 ——- 230

दि. 18 ऑगस्ट रोजी शहरनिहाय केलेल्या अ‍ॅन्टीजेन तपासण्या आणि पॉझिटिव्ह
अंबाजोगाई—–1696 ——— 37
आष्टी—————630———-17
केज—————-697———--20
माजलगाव——-1425 ———-71
परळी ————1321———- 67
एकूण———— 5769———
212

बीड जिल्ह्याची 20 ऑगस्ट दुपारी 5:30 पर्यंतची कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 3203
कोरोना मुक्त 1719
एकूण मृत्यू- 75
उपचार सुरु- 1409

Tagged