jayakwadi dharan nathsagar

नाथसागर 71 टक्क्यांवर

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

पैठण, दि.20 : पैठण येथील नाथसागर धरणाच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी या धरणाचा पाणीसाठा 71.20 टक्यावर पोहचला आहे. सध्या वरील धरणांतून 12,930 क्युसेक आवक सुरू आहे. त्यामुळे नाथसागरातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जवळपास अकरा फूट पाण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिले आहे.

गेल्या आठवड्यापासून नाथ सागराच्या पाणलोटक्षेत्रात मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वरील धरणातून समाधानकारक पाण्याची आवक पाहून 31 ऑगस्टपर्यंत गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची संभाव्य परिस्थिती राहील. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत तशाच पध्दतीने नियोजन केले आहे.

Tagged