नीलम गोऱ्हे करणार शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक जोरदार झटका बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेते आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.

नीलम गोऱ्हेंसह आणखी दोन पदाधिकारी आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. ठाकरे गटातील विप्लव बाजोरिया, मनिषा कायंदेंपाठोपाठ नीलम गोऱ्हेही शिवसेनेत दाखल होत असून ठाकरे गटाच्या परिषदेतल्या 11 पैकी तीन आमदार शिंदेसोबत असणार आहेत. दरम्यान ठाकरेंकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे.

Tagged