बीड एलसीबीने राज्यात धुमाकूळ घालणारा कुख्यात कार चोर पकडला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

केशव कदम – बीड
बीड दि.6 : स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पदभार घेतात पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पाहिली कारवाई केली आहे. गुरुवारी (दि.6) कार चोराच्या मुसक्या आवळल्या असून त्याकडून एक कार जप्त करण्यात आली आहे. सदरील आरोपी हा सराईत असून त्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शेख नदीम शेख दाऊत (रा.धाड ता. जि. बुलडाणा ह.मु.जालना) असे आरोपीचे नाव आहे. शेख नदीम शेख दाऊत याने तेलगाव ता.माजलगाव येथून चोरी केलेली स्वीप्ट डिझायर सध्या वापरत आहे. सदरची गाडी ही जालना येथील राहत्या घरासमोर उभी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशाचे पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पहाणी केली असता सदर ठिकाणी एक इसम पाढऱ्या रंगाच्य स्वीप्ट डिझायरसह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेटले. त्याचे नाव शेख नदीम शेख दाऊत असल्याचे सांगितले. सदरील कार ही तेलगाव येथून चोरलेली असल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संतोष साबळे, सफौ/तुळशीराम जगताप, पोह.मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना.सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, पोशि.सचिन आंधळे, अशोक कदम यांनी केली.

अनेक ठिकाणी गुन्हे दखल
या आरोपीवर येवला शहर, सिडको औरंगाबाद शहर, सिन्नर नाशिक, तुळजापुर, सिलोड औरंगाबाद ग्रामीण, देऊळगाव राजा आदी ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Tagged