corona

बीड जिल्हा : आणखी पाच जण कोरोनामुक्त

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात सुरु असलेल्या आरोग्य सर्वेक्षणातून health survey स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढवताच कोरोनाग्रस्तांची corona possitive संख्या वाढू लागली आहे. आता आकडा दीडशेपार गेला असून उपचाराखालील रुग्ण संख्येचेही अर्धशतक पूर्ण झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा हा 117 इतका आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात cs ashok thorat यांनी ही माहिती दिली आहे. तर आज (दि.8) 5 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

      आजपर्यंत जिल्ह्यातील 167 तर परजिल्ह्यातील 9 असे एकूण 176 कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. तर आज बीडचे दोघे तर आष्टीचे तिघे असे एकूण 5 जण कोरोनामुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज discharge देण्यात येत असल्याने जिल्ह्यात उपाचाराखाली रुग्ण संख्या 45 तर परजिल्ह्यात एक असे एकूण 46 रुग्ण आहेत. तसेच कोरोनामुक्त corona free होणार्‍यांचा आकडा जिल्ह्यातील 117 तर परजिल्ह्यातील 6 इतका आहे. तर जिल्ह्यातील 5 व परजिल्ह्यातील 2 असे एकूण 7 रुग्ण मयत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आरोग्य सर्वेक्षण सुरु असून कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवताच रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

नागरिकांनी आणखी खबरदारी घेण्याची गरज
जिल्ह्यात कोरोना वाढला आणि नागरिकांची भिती कमी झाली असेच काही चित्र निर्माण झाले आहे. नागरिकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. वृद्ध, बालकांसह विनाकारण घराबाहेर पडू देऊ नये, मास्क mask वापरावा, सार्वजनिक ठिकाणी public place थुंकू नये तसेच गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

Read karyarambh e paper

Tagged