भूगर्भ शास्त्रज्ञाची माहिती
दि.6, बीड : बीड आणि जिल्ह्याच्या अधिकतम भाग आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी एका गूढ आवाजाने ARTH QUICK हादरून गेला. त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा? या विषयी बीडमध्ये तर्क वितर्क लढविणे सुरू होते. परंतू आता हा आवाज नेमका कशामुळे झाला याविषयी माहिती समोर आली आहे.
बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी कार्यारंभशी बोलताना सांगितले की हा आवाज झाल्यानंतर आम्ही राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क केला असता भुगर्भ शास्त्रज्ञ रोहन पवार म्हणाले की हा आवाज भुकंपाचा नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. भुगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर एक पोकळी निर्माण होते. त्यात हवेच्या दाब तयार झाल्यानंतर असे आवाज जमीनीतून येतात, असे त्यांनी सांगितले.