r raja

एसपींविरूद्ध 11 पोलीस कर्मचार्‍यांची मॅटकडे धाव

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अन्यायकारक बदलीचा आरोप

बीड : बीडचे पोलीस अधीक्षक आर. रामास्वामी यांच्या विरोधात आता पोलीस दलात असंतोष निर्माण झाला आहे. तब्बल 11 पोलीस कर्मचार्‍यांनी अन्यायकारक बदलीविरोधात मॅटकडे धाव घेतली आहे.

जिल्ह्यात एकीकडे अवैध धंदे वाढल्याचा आरोप केला जात असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनच या लोकांशी हात मिळवणी करत असल्याचे अनेक प्रसंगातून समोर आले आहे. बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून आर. रामास्वामी हे वादग्रस्तच ठरले आहेत. पोलीस अधिक्षक आर रामास्वामी यांनी नुकत्याच पोलीस दलात काही बदल्या केल्या आहेत. यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचे काही प्रस्ताव होते. मात्र, स्वामी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीन ते चार पोलीस मॅटमध्ये गेले आहेत. काही आजारपणामुळे बदली मागणार्‍या पोलिसांना देखील एस.पी. राजा यांनी ऐकून न घेता, विनंती बदली न करता अन्याय केला असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या प्रकारामुळे अखेर तब्बल 11 कर्मचार्‍यांनी एससी राजांच्या या अन्यायाविरुद्ध थेट मॅटकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी निकालाकडे लक्ष असणार आहे.

Tagged