अंबाजोगाईत 15 लाखांचा गुटखा पकडला!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अंबाजोगाई दि.7 : मागील काही महिन्यांपासून नव्याने केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आलेल्या परिविक्षाधीन पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा धडका सुरु केला आहे. नुकताच मांजरसुंबा परिसरात दोन ट्रक गुटखा पकडला होता, त्याचबरोबर इतरही गुटख्याच्या कारवाया केल्या आहेत. शनिवारी (दि.6) रात्री अंबाजोगाई शहरामध्ये 15 लाख 23 हजाराचा गुटखा पकडला. त्यांच्या या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
अंबेजोगाई शहरातील गुटखा विक्री करणार्‍या गणेश पानमेटरियल दुकानावर शनिवारी रात्री छापा मारला. यावेळी सुगंधी पान मसाला गुटखा, सुगंधी तंबाखू असा एकूण 15 लाख 23 हजार 722 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी गणेश सिधलींग बिडवे (रा.अंबाजोगाई) याच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 328, 272, 273 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपनिरीक्षक माने, पोहे. बाबासाहेब बांगर, सुहास जाधव, बालाजी दराडे, सयद विकास, चोपणे महादेव, सातपुते रामहरी, भांडाने, शेंडगे, राजू वंजारे, मधुकर तांदळे सर्व उप विभाग केज यांनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tagged