शस्त्राचा धाक दाखवून सिरसाळ्यात दरोडा!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड


नगदी 92 हजारांसह सोन्या, चांदीचे दागिने लुटले
सिरसाळा
दि.7 : चार दरोडेखोरांनी तलवारी सारख्या शस्त्रांचा धाक दाखवत नगदी रक्कम व सोन्या चांदीचे दागिणे लुटल्याची घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवारी (दि.7) पहाटेच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी नगदी 9 हजार 200, सोन्या चांदीची दागिणे असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडली. घटनास्थळी सिरसाळा पोलीसांनी धाव घेतली. तसेच घटनास्थळावर चोरट्यांच्या शोधासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ हे दाखल झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
येथील संपत पुरी व त्यांचे कुटुंब झोपेत असतांना अज्ञात दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यांची पत्नी व मुलीला तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्याचबरोबर संपत पुरी यांना मारहाण करून नगदी 9 हजार 200, सोन्या चांदीची दागिणे असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. कपाटातील इतर साहित्य दरोडेखोरांनी चोरून नेले. हे दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत असल्याचे पुरी कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले. घटनेची माहिती सिरसाळा पोलीसांना झाल्यानंतर उपनिरीक्षक जोंधळे, एकशिंगे, शेळके, मिसाळ, संजय वडमारे, नसिर शेख, सखाराम पवार, अशोक दुबाले, यांच्यासह आदींनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या प्रकरणी सिरसाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Tagged